भीमशक्तीचा नवा फंडा, आमदारांच्या घरासाठी मागताहेत चंदा; पहा नेमकं काय
आमदारांच्या घरासाठी आता भीमशक्तीही रस्त्यावर उतरली आहे. भीमशक्तीने रस्त्यावर उतरून भीक मागून चंदा गोळा केलाय.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे भीमशक्ती रस्त्यावर उतरली होती. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून ही भीमशक्ती भीक मागून पैसे जमा करत होती. ही भीक होती आमदारांच्या घरासाठी..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा केली. पण, एकीकडे दारिद्र्य रेषेखालील मागासवर्गीय झोपडपट्टीतील लोकांना अद्याप घरकुले मिळाली नाहीत. अनेक वर्षापासून रमाई आवास योजना अंमलात आणली होती.
परंतु, बऱ्याच वर्षापासून लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी उपलब्ध झाला नाही याचा निषेध करून हा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी भीमशक्तीच्यावतीने करण्यात आली.
राज्यातील आमदारांच्या घरबांधणीसाठी मागासवर्गीयांच्या गरीब जनतेच्या झोपडपट्टीत जाऊन भीमशक्तीने भीक मागून हा चंदा गोळा केला. जमा करण्यात हा चंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा तहसीलदार मार्फत पाठवण्यात आला.