भिवंडी : समृद्धी महामार्गाला विरोध वाढतचं चाललाय. भिवंडी तालुक्यातल्य़ा चिराडपाडाच्या शेतक-यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घर घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतक-यांनी केलाय. 


‘आधी आम्हाला मरण द्या नंतर आमची घरं घ्या’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंबर हेक्टर शेतीक्षेत्र या महामार्गासाठी जाणार असल्य़ानं या शेतक-यांनी शासन आणि मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला भेट घेतली. पण कुणीही दखल घेत नसल्यानं शेतक-य़ांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आधी आम्हाला मरण द्या नंतर आमची घरं घ्या असे बोर्डही त्यांनी घराबाहेर लावून ठेवलेयत. या भागातल्या चिराडपाडासह पिसे आणि आमने या गावातली शेतीही जाणार आहे. 


चिराडपाडामध्ये आक्रमकता जास्त


पण चिराडपाडामध्ये आक्रमकता जास्त आहे कारण या गावातलं हे पहिलंच भूसंपादन नाहीये याआधी एमएसईबी टाटा पॉवर हायटेन्शन टॉवर गॅसपाईपलाईनसाठी असे एकूण पाचवेळा भूसंपादन करण्यात आलंय. त्याचा अजुनही मोबदला मिळालाच नाही आणि आता सहाव्या वेळी समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होतंय. 


सत्तर टक्के शेतकरी भूमीहीन आणि बेघर होणार


सत्तर टक्के शेतकरी भूमीहीन आणि बेघर होणार आहेत. समृद्धीसाठी शासनाच्या किव्हा माळरानातून महामार्ग वळवला तर शेतक-यांना मोठ दिलासा मिळणारय.