भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव
![भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2019/10/29/355172-bhiwfnageeg.jpeg?itok=TiRmhbiB)
मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजल्याच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतंय
कपिल राऊत, झी २४ तास, भिवंडी : भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावातल्या बस स्टँडजवळ असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागलीय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजल्याच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतंय. मायश्री कम्पाऊंडमधील 'प्रीमियर ट्रेडर्स'च्या गोदामाला आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सध्या आग आटोक्यात आली असली तरी अद्याप पूर्ण आग विझलेली नाही. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.