ठाणे : भिवंडी पडघा (Bhiwandi Padgha) पोलीस ठाण्याहद्दीतील उबंरखांड पाच्छापूर जंगलात दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह ( bodies) झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून वडिलांनाही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीपत बच्चू बांगरी असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांनाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


पत्नी रंजना (३०) ,मुलगी दर्शना (१२), रोहिणी (६) आणि मुलगा रोहित (९) यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेत. मात्र ही घटना संशयास्पद असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. दरम्यान, अशीच घटना काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यात ही घडली होती.