नाशिक : छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं असलं, तरी उद्धव ठाकरे भुजबळांच्या प्रवेशाबद्दल ठाम नकारही देत नाहीत. त्यातच आता सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांबद्दल नवं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ यांना मी फोन केला होता, पण आजारी असल्यामुळे त्यांनी आपला फोन उचलला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. नाशिकला त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


प्रत्येक जण पक्ष सोडण्यासाठी कारखाना किंवा बँकांची चौकशी अशी कारणं सांगत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला जाण्याच्या शुभेच्छा. पण प्रत्येकाने शरद पवार यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांची, वर्षांची आठवण ठेवावी. आमच्या मनात क्लिमिश नसेल, पण प्रत्येकाला शुभेच्छा, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.


राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल. प्रकरण न्यायकक्षेत असल्यामुळे बोलणं उचित होणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.