भिवंडी : भिवंडी शहारात मोठ्या प्रमाणात एटीएममधून बँक ग्राहकांना लुटण्याचे प्रकार घडत असल्यानं नागरिकांत चिंतेचं वातावरण पसरलंय. अशातच भिवंडीतल्या एटीएममधला धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएममध्ये कशा पद्धतीनं जबरदस्तीनं घुसून कोण किती पैसे काढतो याची पाहणी करुन, लगेच बाहेर जाऊन त्याची माहिती बाहेर साथीदाराला सांगितली जाते. अशा प्रकारे सापळा लावून लुटण्याचा प्रयत्न केला जातो. 


या टोळक्यापैकी रिक्षात बसलेले इतर साथीदार चाकूचा धाक दाखवून पैसे लुटतात. भिवंडीतल्या शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून आतापर्यंत अशा चार लुटमारीच्या घटना टोळक्यांकडून उघड केल्या आहेत.