अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, `ये तो सिर्फ...`
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar Group Primpri Chinchwad NCP Leader Resignation राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज हे पदाधिकारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. मोदी बागेत हा पक्ष प्रवेश पार पडेल. माजी आमदार विलास लांडे हेही आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याबरोबर राहुल भोसले यश साने आणि इतर 25 जण आज प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यासंदर्भात बोलताना, "पिंपरी-चिंचवड शरद पवारांना मानणारे मोठ्या संख्येनं आहेत. 20 नगरसेवक आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत," असं सांगितलं. "नाराजीच कारण नाही पण अजित पवार यांच्यावर राज्यातच नाराजगी आहे त्यामुळे अनेक जण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है," असं सूचक विधानही कामठे यांनी केलं.
तसेच, "पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे 10 नगरसेवक ही आमच्या संपर्कात आहेत," असा दावा कामठेंनी केला आहे. "शरद पवारांना मानणारा पिंपरी चिंचवडचा वर्ग मोठा आहे. काही कारणास्तव ते तिकडे गेले होते. शहराध्यक्ष नात्याने मी सर्वांचा सन्मान करत आहे," असं कामठे म्हणाले.
नक्की वाचा >> BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'
अजित पवार गट सोडणाऱ्यांची यादी
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आज शरदचंद्र पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत खालील नगरसेवकही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
समीर मासोळकर
राहुल भोसले
पंकज भालेकर
दिवंगत दत्ता साने कुटुंबीय
यश साने
वसंत बोराटे
विनया तापकीर
संगीता ताम्हणे
घनश्याम खेडेकर
अजित पवार गटाचं टेश्न वाढणार
दोनच दिवसांपूर्वी अजित पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकामगोमाग एक राजीनामे दिले होते. अपरिहार्य कारण तसेच वैयक्तिक कारण सांगत आपण राजीनामा देत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं. आता या सामुहिक राजीनाम्यानंतर हे सर्व पदाधिकारी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत असल्याने अजित पवारांचं होम ग्राऊण्ड मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं आव्हान मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.