मुंबई : सत्तापेच आणि संघर्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. प्रत्येक क्षणी नवनवीन घडामोडी समोर येत असताना आता एक मोठी बातमी आहे. सत्तापेचात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता विधीमंडळाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधान सभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे. 


गटनेते एकनाथ शिंदे यांनी गट नेते पदावरून दावा केला होता.  आता नियमानुसार चौधरी यांची विधीमंडळात नोंद केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना पुढील भूमिकेसाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. या पेचावर कोर्ट काय निर्णय देतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.