मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा आज मोठी वाढ पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील अनेक शहरांमध्ये हा व्हायरस पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत आहे. मुंबईत लोकल सुरु केल्यानंतर तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कोरोनाचा फैलाव वाढल्याचं काही जणांचं मत आहे. कोरोनावर अजून कोणतंही ठोस ओषध उपलब्ध नसल्याने कोरोना पुन्हा पुन्हा डोकं वर काढतोय. राज्यात लसीकरण सुरु आहे. पण सर्वांना लस मिळेपर्यंत कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह राज्यात ही आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकलं आहे. यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा कोरोनाचा नवा विषाणू अँटीबॉडीजनाही चकवा देत असल्याचं उघड झालं आहे. राज्यात २४ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यातून प्रत्येकी चार आणि पुण्यातून १२ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. यापैकी अमरावती, यवतमाळ आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या सँपल्समध्ये वेगळं म्युटेशन आढळलं.


कोरोनाचा शिरकाव रोखायचं असेल तर मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं फार महत्त्वाचं आहे. कोरोना व्हायरसचा नवा प्रकार हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरणारा आहे. त्याला आपल्याकडे येण्यापासून रोखणं हाच यावर एकमेव सध्या उपाय आहे.मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्य़े आजही  मोठी वाढ झाली आहे. राज्यात आजही कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे.


आज राज्यात कोरोनाचे ६११२ नवे रूग्ण वाढले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४४,७६५ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अकोला,अमरावती, यवतमाळमध्ये आजही रूग्णसंख्येतील वाढ लक्षणीय आहे.


अमरावतीत E484K हे म्युटेशन आढळलं. यवतमाळमधील सँपल्समध्ये N440K हे आंध्रप्रदेशात आढळणारं म्युटेशन सापडलंय. हे दोन्ही प्रकार अँटीबॉडीजना चकवा देतात. तर साताऱ्याच्या सँपल्समध्ये V911I ((911 नंतरचं अल्फाबेट हे इंग्रजी आय आहे))  हा नवा प्रकार आढळला आहे. मात्र याचे फारसे रेफरन्सेस आढळत नाहीत. 


दरम्यान अमरावतीतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबदल जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहितीच नसल्याचं समोर आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात आढळणाऱ्या A2 टाईपचेच हे कोरोनाचे प्रकार आहेत. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकाचे स्ट्रेन या सर्व 24 सँपल्समध्ये आढळलेले नाहीत.