मुंबई  : अर्थसंकल्पावरील गृह विभागाच्या चर्चेत भाग घेताना भाजप आमदार अँड. आशिष शेलार यांनी राष्ट्रीयकृत व खासगी बँकांना फसवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश केला. विविध बँकांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केल्या आहेत. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, चौकशीसाठी राज्य सरकारकडे परवानगी मागत आहे. त्यामुळे राज्यसरकारने ही परवानगी द्यावी अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषीत केलेल्या आणि  पनामा पेपर्समध्य नाव आलेल्या पाकिस्तानी एजन्टचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला.


या कंपनीचा सीईओ हा  कॅनडातील नागरीक असून त्याचे नाव तुमुलूरी असे आहे. हा तुमलुरी म्हणजे जागतिक  पातळीवर घोटाळेबाज म्हणून घोषीत असून ज्याप्रमाणे भारताने नीरव मोदीला घोटाळेबाज म्हणून घोषीत केले. त्याप्रमाणे हा तुमलुरी आहे. त्याला युरिपेयन युनियनसह माल्टा, कॅनडा यांनी हजारो कोंटीच्या घोटाळयात फरार आणि  मुख्य आरोपी म्हणून घोषित  केले आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून कॅनडाच्‍या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कसे ताशेरे ओढले आहेत, याची माहिती शेलार यांनी दिली.


आमदार आशिष शेलार यांच्या या मागणीची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने दखल घेतली. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दातांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांचा पैसा बुडविणाऱ्या या बड्या कंपंन्याची चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकार देईल. 


राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकामधून विविध कंपन्यांनी सुमारे १३ हजार ४३ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडविले आहे. हा पैसे सामान्य जनतेचा असल्यामुळे या घोटाळेबाज कंपन्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला परवानगी देण्यात येईल, तसेच, या यादीसोबत अन्‍य प्रलंबित केसेसची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला देण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी जाहिर केले.


बँकेचे नाव व बुडीत कर्जाची रक्कम


१. बँक आँफ बडोदा - ७३९ कोटी रु.


२.  पंजाब नॅशनल बँक - १ हजार १०७ कोटी रु.


३. स्टेट बँक ऑफ इंडिया - ४३३  कोटी रु.


४. युनियन बँक ऑफ इंडिया - ४४८ कोटी रु.


५. युनियन बँक आँफ इंडिया- ४४८ कोटी रु.


६. येस बँक - ९८७ कोटी रु. (कंपनी-आयएलएफएस)


७. येस बँक - ५६९ कोटी ४० लाख रु.(कंपनी आयएलएफएस ट्रान्सपोर्ट)


८. येस बँक - ५२९ कोटी रु.( कंपनी आयएलएफएस मेरीटाईम)


९. स्टेट बँक आँफ इंडिया - ६२४ कोटी रु.


१०. स्टेट बँक आँफ इंडिया - १ हजार ९८७ कोटी रु.


११-युनियन बँक आँफ इंडिया- ४ हजार ३७ कोटी रु.


१२. येस बँक - १ हजार ५३ कोटी रु.


१३. येस बँक - २२५ कोटी रु.