खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
कोरोनावरील उपचारांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार
मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत. कारण रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार ठरवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी दिलीय. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय जास्त दर आकारणाऱ्या रूग्णालयांच्या लुटीला चाप बसणार आहे.
जनरल वॉर्डचे दर
अ' वर्ग शहरांसाठी 4 हजार रूपये
'ब' वर्ग शहरांसाठी 3 हजार रूपये
'क' वर्ग शहरांसाठी 2 हजार 400 रूपये
फक्त ICU आणि विलगीकरणाचे दर
'अ' वर्ग शहरांसाठी 7 हजार 500 रूपये
'ब' वर्ग शहरांसाठी 5 हजार 500 रूपये
'क' वर्ग शहरांसाठी 4 हजार 400 रूपये
व्हेंटिलेटर ICU विलगीकरणाचे दर
'अ' वर्ग शहरांसाठी 9 हजार रूपये
'ब' वर्ग शहरांसाठी 9 हजार 700 रूपये
'क' वर्ग शहरांसाठी 5 हजार 400 रूपये
'अ' वर्ग शहरांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रांचा समावेश असणार आहे. पुणे, पुणे महानगर क्षेत्र आणि नागपूर या शहरांचा देखील समावेश आहे. तर यामध्ये भिवंडी, वसई-विरार हे क्षेत्र वगळण्यात आले आहेत.
'ब' वर्ग शहरांमध्ये नीशिक औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, सांगली, मालेगाव, नांदेड या शहरांचा देखील समावेश आहे. 'क' वर्ग भगात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्त सर्व शहरांचा समावेश असणार आहे.