MHADA Lottery 2023 : मुंबई पुण्यानंतर मराठवाड्यात म्हाडाची मोठी लॉटरी! हक्काच्या घरासाठी आत्ताच अर्ज करा
हक्काचं घर असाव अस प्रत्यकाचेच स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा करत असतात. आता मुंबई पुणे पाठोपाठ मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये म्हाडाची घर खरेदी करता येणार आहेत (MHADA Lottery Aurangabad 2023).
MHADA Lottery Aurangabad 2023: मुंबई पुण्यानंतर मराठवाड्यात म्हाडाच्या घराची लॉटरी निघाली आहे (MHADA Lottery 2023). म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर झाली आहे. म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे 936 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी निघणार आहे (MHADA Lottery Aurangabad 2023).
म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या 936 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे.
9 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. 10 मार्च 2023 रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत तसेच https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करु शकता. औरंगाबाद मंडळ हे म्हाडाचे दुसरे मंडळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार आहे.
औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 936 सदनिकांपैकी 605 सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 38 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 65 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 151 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 3 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत ७४ सदनिका असून या गटासाठी उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
सोडतीसाठी अर्ज नोंदणीकरिता 02269468100 आणि ऑनलाईन पेमेंट करिता 8888087766 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधवा.
मध्यम उत्पन्न गटासाठी मुंबईत म्हाडाची 700 घरं
पहाडी गोरेगाव येथे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्या टप्प्यात 3 हजार 15 घरे बांधली जात असून यात पहिल्यांदाच 35 मजली इमारतीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी 27 मजली इमारत प्रस्तावित केले आहे. तसेच 35 मजली इमारतीत मध्यम गटासाठी 700 तर, 27 मजली इमारतीत 129 घरे असणार आहेत.
साऊथ मुंंबईमध्ये म्हाडाची लॉटरी
साऊथ मुंंबईत असलेल्या कुलाबा परिसरात म्हाडा नवी वसाहत बांधणार आहे. यामुळे साऊथ मुंंबईत घर घेण्यास इच्छुक असलेल्यांची स्वप्न पूर्ती होणार आहे.
पुण्यात म्हाडाची जंबो लॉटरी
पुण्यात म्हाडाने 5,990 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला लागणार आहे
एका दिवसात मिळणार म्हाडाच्या घराचा ताबा
घर मिळताच विजेत्यांना देकार पत्र मिळाल्यानंतर त्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरल्यास अशा विजेत्यांना एका दिवसात घराचा ताबा मिळणार आहे. दरम्यान सोडतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, फक्त घराची चावी आणि कराराच्या कारणानंच इच्छुकांना म्हाडाच्या कार्यालयात जावं लागणार आहे.