मुंबई : Maharashtra Budget : राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. (Big news CNG will be cheaper in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आलाय. साडे तेरा टक्क्यांवरुन सीएनजीवरचा कर ३ टक्क्यांवर आणण्यात आलाय. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्यानं पीएनजीही स्वस्त होणार आहे. मात्र पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सरकारनं करकपात केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.


दरम्यान, आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटींचा निधी. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येईल.


प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार, नाशिक नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसंच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.


राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून जाहीर केलाय. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या सगळ्या जिल्ह्यात  प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय उभारलं जाईल. तसेच अकोला आणि बीड इथं आधीच रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.