पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Pune Water Cut on Friday : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांच्या नळाचं पाणी गूल होणार आहे. संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येत्या शुक्रवारी 24 मे रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून महापालिकेने जपून पाणी वापरण्याचं आवाहन केलंय.
देखभाल दुरुस्ती तसंच विद्युत विषयक कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाने दिलीय. शनिवारी सकाळी उशिरा तसंच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शनिवारी संध्याकाळची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याच आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.
'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद !
पुणे शहराच्या मध्यवती भागातील पेठासह गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, चतुः श्रृंगी टाकी परीसर पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.