शहरात आपलं एक हक्काचं घर असावं असं प्रत्येक सामान्या माणसाचं स्वप्न असतं. पण स्वप्न दिवसेंदिवस लांब जाताना दिसत आहे. शहरांमधील घरांच्या किंमतीत होणारी वाढ ही गगनभरारी घेत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात घरांच्या किंमतीत मोठी घट झाली होती पण त्यानंतर कोरोनाचं सावट कमी होताच यामध्ये वाढ झाली आहे. शहरांमध्ये घरांच्या खरेदी विक्रीसोबतच नवीन प्रोजेक्टमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात महानगरांमध्ये घरांची किंमत सरासरी 1 कोटी 23 लाख रुपये इथपर्यंत पोहोचली आहे.


अहवालानुसार आकडेवारी 


अनारॉक ग्रुपने दिलेल्या अवहालानुसार, एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत या कालावधीत 2,27,400 घरांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात 2,35,200 घरांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत अनुक्रम 2,89,00,309 रुपये आणि गेल्यावर्षी 2,35,00,800 रुपये इतकी होती. घरांच्या विक्रीत 3 टक्के घट झाली असून 18 टक्क्यांनी मुल्यात वाढ झाली आहे. 


शहर 2024 ची किंमत 2025 ची किंमत
मुंबई 1.47 1.43
दिल्ली 0.93 1.45
कोलकाता  0.53 0.61
पुणे  0.66 0.85
चेन्नई 0.72 0.95
हैदराबाद 0.84 1.15
बंगलुरु 0.84 1.21
एकूण 1.00 1.23

मुंबईतील घरांची किंमत


मुंबईत घर खरेदीसोबतच भाड्याच्या घराच्या किमतीतही वाढ झाली आहे. प्रति चौरस फूट प्रति महिना 86 रुपये 50 पैसे इतकी रक्कम मोजावी लागत आहे. एवढंच नव्हे तर मुंबईसोबतच दिल्लीचं आणि त्यामागोमाग नवी मुंबईच्या घरांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. अनुक्रमे प्रति चौरस फुटांसाठी अनुक्रमे 37.55 रुपये आणि 33.83 रुपये इतकी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे घर खरेदीसोबतच भाड्यांच्या घरातही वाढ झाली आहे. 


दर वाढण्यामागची कारणे काय? 


मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये पुर्नविकासाच्या कामासोबतच नव्या प्रकल्पांनी देखील वेग धरला आहे. यामुळे भाड्याच्या घरांसाठी मागणी वाढली असून नवीन घर खरेदी करण्याकडे देखील लोकांचा कल वाढला आहे.
घरभाडं वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे, घरांसह इतरही अनेक पायाभूत सुविधा सोबती मिळतात. अनेकदा विकेंडला घराबाहेर न जाता कॉम्प्लेक्समध्ये सुविधा मिळवण्याकडे नागरिकांचा कल आहे.
शहरात मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास असणाऱ्या मध्यमवयीन वर्गानं मोठ्या प्रमाणात घरं भाड्यानं घेतल्याची बाब या सर्वेक्षणातून निदर्शनास आली.
साधारण 30 ते 45 वयोगटातील वर्गाची शहरात भाड्यानं घर घेण्याची मागणी वाढत असल्याचं इथं लक्षात आलं.