पालघर : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना मोठा दणका मिळाला आहे. राजेंद्र गावित अडचणीत आले आहेत.  चेक बाऊन्स केस प्रकरणात त्यांना पालघर कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे . शिवाय सदर दंड आणि शिक्षेला 14 मार्च पर्यंत स्थगिती ही देण्यात आली आहे.


खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता. 


त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावन्यात आलंय.शिवाय या संधर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.