मुंबई: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनसंदर्भात काय म्हणाले राजेश टोपे? 


राज्यात तूर्तास तरी लॉकडाऊन करणार नाही. मात्र ज्या भागात रुग्णसंख्या जास्त असेल किंवा जिथे रुग्ण वाढत आहेत त्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा काही वेळ पुरत्या चालू ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल.


ज्या ठिकाणी गर्दी होत आहे तिथे गर्दी टाळणं महत्त्वाचं आहे. क्वारंटाइनचा कालावधी 7 दिवसांचा असणार आहे. आता RTPCR नाही तर अँटिजनवर जास्त भर द्यावा लागणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणं बंधनकारक आहे. 



RTPCR की अँटिजन?


अँटिजन टेस्ट झाल्यानंतर RCPCR करण्याची गरज नाही. 90 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणं नाहीत. मात्र नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. असं आवाहन यावेळी राजेश टोपे यांनी केलं आहे. 


येणाऱ्या 15 दिवसांत काय परिस्थिती आहे त्यावर पुढचे निर्णय घेण्यात येतील. तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही. मात्र निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. गेल्या 3 दिवसांत राज्यात दुप्पट रुग्णसंख्या होत आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. 


राज्यात आज कोरोनाचा आकडा किती? 


मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे आज राज्यात 25 हजाराच्या आसपास रुग्णसंख्या सापडण्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. काल राज्यात 10 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 


मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोव्हिड टाळण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवणंही गरजेचं असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.