जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने बजावलेलं पकड वॉरंट अखेर रद्द करण्यात आलंय.


प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दमानिया यांच्यावर मुंबईत दोन वेळा कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. प्रकृतीच्या कारणामुळं त्या न्यायालयात हजर राहू शकल्या नाहीत याबाबतचे पुरावे दमानिया यांच्या वकिलांनी रावेर न्यायालयात सादर केल्याने रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी दमनियांविरुद्धचे पकड वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिलेय. 


दमानिया यांची अटक टळली 


या खटल्याची सुनावणी आता येत्या ७ मार्चला होणार असल्यानं दमानिया सुनावणीला हजर राहणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयापुढं सांगितले. यामुळे तूर्तास तरी अंजली दमानिया यांची संभाव्य अटक टळली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.