सातारा : अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील फिर्यादी फिरोज पठाण यांनी २०१२ मध्ये ज्या खंडणीच्या गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती, ती तक्रार मागे घेण्याची तयारी केली आहे. याबाबत फिरोज यानी प्रतिज्ञापत्र सातारा न्यायालयात सादर केले आहे. यामुळे बिचुकलेला लवकर जामीन‌ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अभिजीतला जामीन मिळाणार असला तरी न्यायालयाचा सर्व प्रक्रियामधून बिचुकले याला जावेच लागणार आहे. काल बिचुकलेच्या वकिलांनी सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावेळी फिरोज पठाण यांनी आपले प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे. सध्या बिचुकलेला कोल्हापुर येथील कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. 


खंडणीप्रकरणी अभिजीत बिचुकले याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चेक बाऊन्सप्रकरणी जामीन मिळालेल्या आणि २०१२ मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बिचुकले याचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून तो फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.