पुणे अपघातप्रकरणात मोठी अपडेट; बदललेलं रक्त नेमकं कुणाचं? महत्वाचा पुरावा हाती लागला
पुणे अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच आता तपास अधिकाऱ्यांना महत्वाचा पुरावा हाती लागला आहे.
Pune Porsche Car Accident: पुणे अपघातप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बदललेलं रक्त नेमकं कुणाच होते याबाबत महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. पुणे अपघातप्रकरणी रक्त नमुने फेरफारप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आईवडिल विशाल आणि शिवानी अग्रवालची पोलीस कोठडी वाढवण्यात आलीये. दोघांनाही 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर, डॉ. तावरे, शिपाई अतुल घटकांबळे यांची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली असून तिघांनाही सात तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय...बदलण्यात आलेल्या रक्त्याच्या नमुन्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. हा महत्त्वाचा पुरावा असल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं. त्याअनुषंगाने तपास करायचा असून सर्व आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. ससूनचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यासह मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी आगरवल यांची पोलीस कोठडी आज संपली. त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कारने बाईकला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
कोर्टात आज काय घडलं?
बदलण्यात आलेलं रक्त मुलाच्या आईचे असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्ट आज सकाळी आला आहे. महत्वाचा पुरावा हाती आलाय. आणखी तपास करायचा आहे. तपासात प्रगती आहे. आता सगळे आरोपी एकत्र आहेत. त्यांचे परस्परांतील कॉल रेकॉर्ड, पैशांची देवाण घेवाण यांबत तपास करायचा आहे. त्यातून संपूर्ण साखळी जोडली जाणार आहे. त्यामुळे आई आणि वडील दोघांची आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. त्याचप्रमाणे इतर आरोपी आणि अगरवाल पती पत्नी यांनी कशाप्रकारे कट रचला याचा तपास करायचा आहे. कॉल डिटेल्स आणि इतर बाबींचा तपास करायचा आहे. अगरवाल आणि इतर आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनाही आणखी 7 दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांमार्फत सरकारी वकीलांनी घेतली.
आरोपी गेले 10 दिवस पोलीस कोठडीत आहे. घर झडती झाली. घटना घडली त्या दिवशी आरोपी सुटीवर होते. आर्थिक व्यवहारात सहभाग नाही.
त्यामुळे आजवर मिळालेली पोलीस कोठडी पुरेशी आहे असा युक्तीवाद बचाव पक्षांचे वकिल डॉ तावरे यांनी केला.