बुल़डाणा :  शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, राजमाता दुर्गाउत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर वारकरी महामंडळाने ही किर्तनाला विरोध केला आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी जमविणे. देऊळगाव महीच्या राजमाता दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीचे ठरले असून तिघाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.  दरम्यान बिगबॉस फेम हभप. शिवलिला पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला असतांनाही  आयोजक आपल्या निर्णयावर ठाम राहिले, आणि शिवलीला यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये असे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. हे आदेश देऊन सुद्धा देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्यावतीने ह-भ-प शिवलीला पाटील यांचे कीर्तनाचे ९ ऑकटोबर ला आयोजन करण्यात आले होते. यावेळी देऊळगाव मही येथील मंडळातर्फे आयोजित सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास दोनशेच्या वर महिला - पुरुषांनी गर्दी केली होती. यासंदर्भात देऊळगाव राजा पोलिसांत राजमाता  मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश गोरे आणि किशोर पोफळकर  यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक झाली 


बिग बॉस मध्ये गेले ही चूक झाल्याचे कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी जाहीर कीर्तनात सांगितले. शिवलीला ही शेतकऱ्यांची मुलगी असून फक्त एक मुलगी, एक महिला कीर्तनकार असल्यानेच  विरोध होत असल्याची टीका शिवलेला यांनी कीर्तनात बोलताना केली आहे. तर बॉग बोसमध्ये आपल्या धर्माची संस्कृती, आपला संप्रदाय, माझे कीर्तन, माझी तुळशीमाळ अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी  म्हणून बिग बॉस मध्ये गेले असलयाचे कबुली शिवलेला यांनी दिली आहे.


बिग बॉसच्या राहून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले असून त्याठिकाणी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन करणे तुळशीचे  पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले असल्याची माहिती कीर्तनकार शिवलीलाताई पाटीलने आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला दिली. एव्हढेच नव्हे तर जिजाऊंची लेक असलयाने कोणालाही घाबरत नसल्याचा इशाराही शिवलेला पाटीलने दिला. 


वारकरी संप्रदाय सोडून शिवलीला पाटील ही विकृत संस्कृतीकडे गेली. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने वारकरी महामंडळाने विरोध केला. तर महाराष्ट्रात त्यांचे कुठेही कीर्तन असले तर ते वारकरी महामंडळ होऊ देणार नाही. जर कीर्तन करायचे असेल पाटील यांना जेष्ठ मंडळींची परवानगी घेऊनच कीर्तन करता येईल अन्यथा येइल, असे सांगितले.