Biggest Egg : बापरे ! कोल्हापुरात कोंबडीने दिलं देशातीली सर्वात मोठं अंडं?
कोल्हापुरातील हातकनंगलेमध्ये कोंबडीने देशातील सर्वात मोठं अंडं दिलं आहे.
कोल्हापूर : देशातील सगळ्यात मोठं आणि वजनदार अंडं कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळलं आहे. तळसंदे गावात दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंडं सापडलं आहे. तब्बल दोनशे ग्रॅम वजनाचं हे अंडं देशातील सर्वात मोठं अंडं असल्याचा दावा दिलीप चव्हाण यांनी केला आहे. आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठ्या अंड्याचा (Biggest Egg) म्हणजे 162 ग्रॅम वजनाचा विक्रम पंजाबमध्ये नोंदवला गेलाय. त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही आहे. तर जगातील सर्वात मोठं तब्बल पाचशे ग्रॅमचं अंडं परदेशात सापडलं होतं.
कोल्हापुरातील हे अंडं पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. कारण याआधी कोणीच इतकं मोठं अंडं पाहिलं नव्हतं. सामान्यत: कोंबडीचं अंड्याचं वजन हे 60 ते 70 ग्रॅमपर्यंत असतं. पण तब्बल 200 ग्रॅम वजनाचं अंडं पाहून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही.
कोंबडीचं हे अंड पाहण्यासाठी आता गावातील लोकं गर्दी करत आहेत. अनेकांना हे अंडं पाहून विश्वास बसत नाहीये.