चंद्रपूर : आता पाहूयात एक थरार चंद्रपूरच्या जंगलातला, दुचाकीवरून जाणा-या दोघा व्यक्तींनी मरण काय असतं हे अगदी जवळून पाहिलं. जंगलातल्या पायवाटेवरून दुचाकीने जात असताना समोर वाघ अवतरला आणि दोन व्यक्तींनी मरण याची देही याची डोळा पाहिले.


मरण याची देही याची डोळा पाहिले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एक वाघ पाठीमागून आणि दुसरा वाघ हल्ल्याच्या स्थितीत असं दृश्य पाहायला मिळालं. दुचाकी वाहनाच्या समोर एका जिप्सीतून या दुचाकीस्वारांना सूचना देत होते. मात्र वाघ हल्ला करणार असं दिसताच जिप्सीवाल्यानेही वाघाच्या दिशेने गाडी पुढे नेली आणि या दुचाकी स्वारांची सुटका केली.