नाशिक : तब्बल २० महिन्यांनंतर नाशिकच्या जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागलाय. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका भाजप नगरसेवकाचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ ऑक्टोबर २०१५ रोजी जालिंदरचं अपहरण झालं होतं. मात्र, त्याची हत्या झाल्याचं चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या तपासात उघड झालंय.


याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केलीय. यात भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचाही समावेश आहे. हेमंत शेट्टीच्या सांगण्यावरुन हे अपहरण आणि हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. वर्चस्व आणि वादातू ही हत्या झाल्याचं पुढे येतंय.


पंचवटीतील संजयनगर परिसरातून १ आक्टोबर २०१५ रोजी २३ वर्षीय तरुण जालिंदर उगलमुगले गायब झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. बेपत्ता जालिंदर हा दोन संशयितांसोबत अखेरचा दिसला होता... त्यांना पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. ज्वाल्याच्या खुनात पोलिसांनी भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह सहा संशयितांवर शुक्रवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये पंचवटीतील वाघ खुनासह विविध गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांचा समावेश असून, खून करून पुरावे नष्ट केल्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचं तपासात उघड झालंय.