रवींद्र कांबळे, झी मीडिया, इस्लामपूर, सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेतकरी मेळाव्याला आलेली ही गर्दी पैसे वाटून गोळा केल्याचा आरोप होतोय. इस्लामपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या उपस्थितीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी  मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्याचीच परतफेड म्हणून की काय आता जयंत पाटील समर्थकांनी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप केला आहे. 


तर असे पैसे वाटून लोकं गोळा करण्याची संस्कृती भाजपची नव्हे, तर राष्ट्रवादीचीच असल्याचं भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचं म्हणणं आहे.


वर्षानुवर्षं राष्ट्रवादी आणि पर्यायानं जयंत पाटलांचा बालेकिल्ला असलेली इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रस्थापितांना धक्का देणारी ठरली. त्यामुळं भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची ही व्हिडीओ क्लीप हाती लागल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार, हे नक्की.