Girsh Mahajan on Mode of Conduct: राज्य सरकारने (Maharashtra Government) मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल 80 निर्णय घेतले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर आचारसंहित लागण्याची शक्यता असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत. भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच आजची कॅबिनेट बैठक शेवटची असू शकते असंही स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आज कॅबिनेट बैठक होती असं वाटत आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागेल. शेवटची कॅबिनेट बैठक असल्यानेच आम्ही इतके निर्णय घेतले आहेत. नेहमी असंच होतं. तुम्ही 50-60 वर्षांचा इतिहास पाहिला तर शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकामध्ये असे निर्णय घेतले जातात. यात नवीन असं काही नाही," असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. 


राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक


राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावत नव्याने काही महामंडळ स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यात संत गोरोबा कुंभार महामंडळ, कोळी समाज महामंडळसाठी प्रस्ताव मागवण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिलीय. याशिवाय आजच्या बैठकीत लेवा पाटील समाज महामंडळाला मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॉन क्रिमीलयेर संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ओबीसी नॉन क्रिमीलेअरच्या उत्पन्नचा टप्पा 8 लाखाहून 15 लाखापर्यंत नेण्याचा या प्रस्तावात नमुद करण्यात आलं आहे. 



धनगर समाज संदर्भातील शुद्धीपत्रक रद्द करण्यात आलं आहे. धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं शुद्धीपत्रक काढण्यात आलं होतं. धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता.


आजच्या मंत्रिमंडळ बैठखीत आर्थिक विकास महामंडळाचा निर्णयही घेण्यात आला आहे. गुजर समाज, लेवा पाटील समाजात मोठ्या प्रमाणात गरीबी आहे. त्यांना मदत करण्यासाठी महामंडळाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार


याशिवाय  रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. रतन टाटा याना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला होता. तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबई इथं उद्योग भवन उभारलं जात असून त्याला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. ठाणे रत्नागिरी आदी कामासाठी सीएसआर मधून 500 कोटी रुपये रतन टाटा यांनी दिले होते. नवीन उद्योग भवन हे 700 कोटींचे होत आहे याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रधांजली असेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.