मुंबई : मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट दिलीय... तर  बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत राज्य सरकारनं सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी २४ तास'नं मुंबई बँकेतला कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी चौकशीत बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आलीय. क्लीन चीट मिळाल्यानं अर्थातच भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळालाय.


या प्रकरणी बँकेतल्या अधिकऱ्यांवर खापर फोडण्यात आलंय. मुंबई बँकेतील कर्ज प्रकरणांची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत कर्ज प्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्या. 


या अनियमितते प्रकरणी बँकेचे दोन शाखा व्यवस्थापक निलंबित करण्यात आल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. पण त्यावर शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनीच सवाल उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय अधिकारी असे निर्णय कसे घेतील? असा प्रश्न भाजपच्या आमदारांनी विचारलाय.