सातारा : भाजपमधील पुढील मेगा भरतीचा मुहुर्त ठरला आहे. सप्टेंबरचा पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यात ही मेगा भरती होणार आहे. एक सप्टेंबरला महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप हा सोलापुरला होत असून भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह या समारोपाला उपस्थित रहाणार आहेत. असे असताना बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे भाजपात नाराजीचं वातावरण पसरत चालल्याचे चित्र आहे. या आयात केलेल्या नेत्यामुंळे भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. सिल्लोडपाठोपाठ आता साताऱ्यातही राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केला खरा. मात्र गेल्यावेळी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी साताऱ्यात मेळाव घेतला. या मेळाव्यात शिवेंद्रराजे हटावचा नारा देण्यात आला. तसंच ठराव पारित करून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. शिवेंद्रराजे यांची साताऱ्यातून भाजपाची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे दीपक पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शिवेंद्रराजेंविरोधात जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



मेगा भरतीचा मुहुर्त


विरोधी पक्षातील बडे मासे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर त्यानंतर 5 सप्टेंबरला मुंबईत अशीच एक मोठी मेगाभरती होणार असून यानिमित्तानं कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कोणते मोठे नेते भाजपाच्या गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.