मराठा आरक्षणाचा लढा ताकदीने लढणार- महसूल मंत्री
सामूहिक शेती करणा-या गटांना कर्जवितरण केलं जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीये.
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोर्टात लढा सुरु असून आरक्षणाचा लढा ताकदीने लढणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय.
ते अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे बोलत होते.
सामूहिक शेती कर्जवितरण
त्याचबरोबर मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून यापुढे एकट्याने शेती करणे न परवडणारे आहे.
त्यामुळे सामूहिक शेती करणा-या गटांना कर्जवितरण केलं जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीये.
गुन्हा दाखल
यासोबत हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय..