सांगली : सांगलीत एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला.


काय म्हणाले चंद्रकांत पाटील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही, कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, अस वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. सांगली मध्ये भाजपा पदाधिकारी बैठकी वेळी पाटील हे बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्या शिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी काय त्या नेत्यांचं नाव घेणार नाही, माझ्यावर केसेस सुरू आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री होणार, आणि नन्तर दगाफटका होणार हे पण विधीलिखित होत अस ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


हल्ली व्हॉट्स अॅपवर एकमेकांना मेसेज करून नेते आणि कार्यकर्ते संवाद सुरू साधत असतात. पण त्या ऐवजी भेटी गाठी महत्वाची असते. संपर्क आणि संवाद महत्वाचे असतात. मला तर व्हॉट्स अप वर मेसेज आला तर मी भाजपच्या राष्ट्रीय बैठकीला पण जाणार नाही, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


संभाजी भिडेंवर बोलणं टाळलं


संभाजी भिडे यांच्या वक्तव्या बाबत मात्र प्रतिक्रिया देण्याचं देण्याचं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. संभाजी भिडे जे बोलले हे त्याचा काही आगापिछा,  तेव्हा काय विषय होता ते मला माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही, अस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.