Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्याने तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महसूल विभागाने या निर्णयाला विरोध केलाय. तरीही बावनकुळेंच्या महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी पाच हेक्टर शासकीय भूखंड अत्यल्प दरात देण्यात आलाय. आता यावरुनच जमीन लुटारू सरकार म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी जगदंबा संस्थान या सार्वजनिक देवस्थानचे बावनकुळे हे अध्यक्ष आहेत.. याआधीच सरकारने मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या संस्थेला भूखंड दिला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही संस्थेला भूखंड देण्यात आलाय.


दरम्यान मविआ सरकार आल्यास या भूखंड प्रकरणाची चौकशी लावणार अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय.रेडीरेकनर दरानुसार या भूखंडाची किंमत तब्बल पाच कोटी इतकी असल्याचं बोललं जातंय.. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला हा कवडीमोल दरात देण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.