मुंबई : शनिवारी सायंकाळी अजित पवार यांनी विधीमंडळात जाऊन त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर जवळपास २० तासांनी, बऱ्याच राजकीय घडामोडींना तोंड फुटल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या सत्रामुळे आणि यामध्ये कोणताच दोष नसताना शरद पवार यांचं नाव गोवलं गेल्यामुळे उद्विगतेच्या सीमा ओलांडल्या, परिणामी आपण राजीनाम्यापर्यंतच्या निर्णयावर पोहोचल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 


अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. ज्यामध्ये भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना थेट शब्दांत टोला लगावला. 


गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारं राजकीय नाट्य पाहता या राजकीय घड़ामोडींनी पक्ष चार्च होणार नाही, या शब्दांत महाजन यांनी पवारांना टोला लगावला. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा, असं म्हणत त्यांनी पवारांची कानउघडणीही केली. झी २४तासशी संवाद साधताना महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 



मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी आपलं मत मांडली. चौकशी कधी लावावी, निकाल कधी आणि काय द्यावा हे शासन सांगतं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवायही महाजन यांनी बरेच मुद्दे मांडत त्यांची भूमिका स्पष्ट केली.