COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राजकीय फटकेबाजी करताना आपण नेहमीच पाहतो... मात्र रविवारी सायंकाळी गडकरींनी क्रिकेटची बॅट हातात धरून खरीखुरी फटकेबाजी केली. निमित्त होतं खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचं.


पूर्व नागपुरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर आयोजित स्पर्धेच्या ठिकाणी गडकरी क्रिकेटच्या पीचवर पोहचले. 


आमदार कृष्णा खोपडे यांच्या गोलंदाजीवर, अगदी क्रीझबाहेर येऊन त्यांनी उत्तुंग फटकेबाजी केली. 


केवळ क्रिकेटच नव्हे तर बॉस्केटबॉलच्या कोर्टावरही गडकरींनी कमाल केली. भल्याभल्या बॉस्केटबॉलपटूंना डीमधून बास्केट टाकण्यासाठी बराच सराव लागतो. मात्र, गडकरींनी हे कसब अगदी लीलया साध्य केलं.