धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची निवड झालीय. महानगरपालिका निवडणुकीत ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अन्य कुणाचीही मदत न घेता भाजपा स्वबळावर धुळे महानगर पालिकेत सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे, भाजपविरोधात कुठलाही विरोधी पक्ष दोन आकडी संख्या गाठू शकलेला नाही. 


कल्याणी अंपळकर, नवनिर्वाचित उपमहापौर 

आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत, विकास निधी समान वाटपाची अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार मंगला चौधरी यांनी आपला महापौर पदाचा अर्ज मागे घेतला... त्यानंतर आघाडीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारानंही आपला अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं. 


भाजपा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून या निवडणुकीत मंगल चौधरी यांना महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी खान सद्दीम हुसेन यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलं होतं.