हिंगोली : गारमाळ येथे भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते स्वस्त धान्य दुकानाच्या वादावरून एकमेकांसमोर भिडले भाजपच्या एका कार्यकर्त्याने चक्क चौकशीसाठी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवल्याने गावाला छावणीच स्वरूप आलं होतं. भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीत अंदाजे 20 जण जखमी झाले असून दोन्ही गटाच्या 26 जाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गारमाळ येथील १२३ कार्ड धारकांनी स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीचे निवेदन दिले होते. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करण्यासाठी तहसीलचे गारमाळ येथे मंडळ अधिकारी शेख अलबक्ष दाखल झाले होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याने मंडळ अधिकारूयाच्याच श्रीमुखात लागवल्याने सगळा वाद उफाळला. 20 पैकी  आठ  जणांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात  आल आहे.


शहरातील रिसाला बाजार येथे एस.एम. भट्ट यांच रास्त भाव दुकान पूर्वीपासूनच आहे. मात्र, गारमाळ येथे नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर झालय. त्यानुसार पुरवठा विभागाच्यावतीने शेख अलबक्ष आणि इतर कर्मचारी पंचनामा करू लागले. यावरून वाद उफाळला आणि दोन गट सामोरासमोर उभे ठाकले.  पोलिसांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 26 जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.