जावेद मुलानी, झी मीडिया, पुणे : केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मेळाव्यात भाजपाच्या आमदार राम शिंदे(BJP MLA Ram Shinde) यांना चक्क राष्ट्रवादीच्या पटेलांची आठवण झाली. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल(Pralhad Singh Patel) यांचा प्रफुल्ल पटेल(Praful Patel) म्हणून उल्लेख केला. आमदार राम शिंदे  यांना नेमक्यावेळी केंद्रीय मंत्र्याचे नावाच आठवेना. प्रफुल्ल पटेल नाही तर प्रल्हादसिंग पटेल अशी दुरुस्ती केंद्रीय मंत्र्यांनीच केली. 


भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीची धास्ती तर घेतली नाही ना ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रचाराचं गाणं वाजविल्याचा किस्सा ताजा असतानाचं आता केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाच्या आमदाराला चक्क राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची आठवणं झाली.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाची नव्हे तर भाजपाच्या नेत्यांनीचं आता राष्ट्रवादीची धास्ती तर घेतली नाही ना ? अशी चर्चा रंगू लागली आहे.


भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. भिगवण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आणि भाजपाचे आमदार राम शिंदे हे भाषणासाठी उभा राहिले.  मात्र, त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या समोरचं त्यांचा उल्लेख चक्क प्रफुल्ल पटेल असा केला. त्यामुळे उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांसह सर्वचं जण चकीत झाले. शेवटी प्रल्हादसिंग पटेल यांनीचं राम शिंदेंना सांगितले की मी प्रफुल्ल पटेल नाही तर, प्रल्हादसिंग पटेल आहे.  झालेली चूक लक्षात घेत मी शेजारी आहे मला समजून घ्या म्हणतं सारवासारवं केली.