पुणे : भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील, असं भाकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं. दोन्ही पक्ष थकले आहेत. जी खंत काँग्रेसच्या मनात आहे, तशीच पवारांच्याही मनात असेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा पक्षांचं विलिनीकरण होईल, याची सुरूवात सोलापुरातून झाल्याचं शिंदे म्हणाले. तर दुसरीकडे पुढच्या वेळी राज्यसभेत जाण्याइतकं संख्याबळही राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसेल, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल,' असं संजय काकडे म्हणाले आहेत.