पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधल्या पुरनानगर भागात अटल उद्यानाच्या उद्घाटनापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल उद्यानाचं उद्घाटन होणार आहे. पण या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 


घोषणाबाजी करत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही पक्षांच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाल्या होत्या.


त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली. पोलिसांचा मोठा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे.