नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.


संघाच्या सरकार्यवाह पदाची निवड आज होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (शनिवार, १० फेब्रुवारी) स्मृती मंदिर परिसरात सुरु असलेल्या प्रतिनिधी सभेत सहभागी होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही रात्री नागपुरात दाखल झाल्यानंतर थेट रेशीमबाग स्मृती मंदित परिसरात दाखल झाले. संघाच्या सरकार्यवाह पदाची निवड आज होत आहे.


प्रवीण तोगडिया आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आमन-सामने येणार


दरम्यान संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत  विश्व हिंदु परिषद अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आमन-सामने येणार आहेत. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होते याबाबत कमालीची उत्सुक्ता आहे.