...सत्तेत आल्यानंतर अशी बदलली भाजपची भाषा!
सत्तेची ऊब मिळाली की सगळेच कसे बदलतात हे पाहायचे असेल तर पिंपरी भाजप एक उत्तम उदाहरण ठरेल...
पिंपरी चिंचवड : सत्तेची ऊब मिळाली की सगळेच कसे बदलतात हे पाहायचे असेल तर पिंपरी भाजप एक उत्तम उदाहरण ठरेल...
९ ऑगस्ट २०११ रोजी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या थेट बंद पाईपलाईन योजनेविरोधात, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. या घटनेला आता सहा वर्षं उलटून गेली आहेत.
महापालिकेच्या या योजनेला मावळमधल्या भाजपचा तेव्हाही आणि आजही विरोध आहे. विशेष म्हणजे सत्तेत नसताना भाजपनं या योजनेला प्रचंड विरोध केला होता. ही योजना म्हणजे पैसे खाण्याचं कुरण असल्याची टीकाही भाजपकडून केली जात होती.
पण आता त्याच भाजपने सत्तेत आल्यानंतर ही योजना सुरू करण्याचा घाट घातलाय. मावळमधल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असं भाजपनं म्हटलंय. तर दुसरीकडे प्रशासनानं सुद्धा ही योजना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे विचारणा केलीय.