नागपूर : सत्ताधारी भाजपमधील पक्षशिस्त बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशनाचा तिसरा दिवस असूनही भाजपचे अनेक आमदार अनुपस्थित असल्याचं चित्र आहे. तर बरेच आमदार नागपूरमध्ये आलेले असूनही सभागृहात मात्र उपस्थित राहत नसल्याचं निदर्शनास आलंय. 


त्यामुळं अशा बेशिस्त आमदारांना तंबी देणारं पत्रकच भाजप कार्यालयानं काढलंय. सर्व आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झालं पाहिजे, असं त्यांना बजावण्यात आलंय. 


मंत्र्यांकडं काही कामं असतील तर सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर जावं, असंही त्यांना सांगण्यात आलंय.