मुंबई : Rajya Sabha Election : संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यावर आता भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. (BJP Rajya Sabha candidate) यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र पक्षाने शनिवारी याबाबत संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पियुष गोयल केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या जागेवरचं नाव अजून निश्चित व्हायचे आहे. 



भाजपने तिसरी जागा लढवली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेवर माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि राम शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाची निवड करतो हे पाहणं औत्सुक्याचे आहे. 



घोडेबाजार न करता आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 31 मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. केंद्राने परवानगी दिली तर ही जागा निश्चितच जिंकून दाखवू,असे पाटील यांनी म्हटले आहे.