नागपूर :  Congress Leader Nana Patole on BJP Agitation : भाजप नेहमीच मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे. लोकांचे जबाब सुरु आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती नागपूर विमानतळावर मुंबईला रवाना होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. दरम्यान,  पंतप्रधान पद हे एका पक्षाचे नसते. पंतप्रधान देशाचा असतो. मात्र भाजप कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करत आहे. हे चुकीचे आहे. भाजपच्या आंदोलनाबाबत आपण निषेध करत आहोत, असे नाना पटोले यांनी यावेळी म्हटले.


नाना पटोले यांना अटक करा - नितीन गडकरी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले यांनी मोदीला मारु शकतो, असे म्हटले होते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यानंतर भाजपकडून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा निषेध करुत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत पोलिसात तक्रार करण्यासाठी ठिय्या केला. मुंबई, नागपूरमध्ये पोलिसांनी तक्रार नोंदविण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या पोलीस कारवाईच्या मागणीनंतर नाना पटोले यांनी आपण पंतप्रधान मोदी यांना काहीही म्हटलेले नाही. तो मोदी गावगुंड आहे. त्याच्याबाबत मी विधान केले होते. मात्र, भाजपने भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, विषयाचा वाक्याचा, अर्थाचा अनर्थ करत आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.


भंडारा पोलिसांना सांगितले आहे की, याचा तपास करा. तसा गावगुंड नसेल तर माझ्यावर कारवाई करा.-हा गावगुंड कोण याचा भंडारा पोलीस तपास करत आहेत. मी भाषणात बोलत नव्हतो. मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो. काँग्रेस पंतप्रधान पदाचा आदर करते. मात्र, भाजपची वृत्ती तालिबानी दिसून येत आहे. या आंदोलनातून भाजपची तालिबानी व्यवस्थेशी जुळली आहे. त्याचा प्रत्यय येत आहे. पोलिसांनी कथित मोदीला पकडले, असे ते म्हणाले.



 भाजपकडून जाणूनबुजून आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या आंदोलनाबाबत आपण निषेध करीत आहे. पंतप्रधान पदाचा मान घालवणाऱ्या या आंदोलनाविरोधात काँग्रेसकडून पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली.