Black And White,  BJP leader Chandrashekhar Bawankule Interview : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे.  ठाकरे आणि शिंदे गटाकडून वर्धापन दिन साजरा केला जात आहे. अशात  ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. . 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली तसेच ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबधाबाबत देखील भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्तासंघर्षातून शिवसेनेचे दोन तुकडे झाले. शिंदेंचा गट भाजपला मिळाला तर ठाकरे विरोधातच राहिले. या फुटीमुळे ठाकरे आणि भाजपात विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलाखतीत भाष्य केले. 


उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद चोरले


उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद चोरले. स्वत: मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. यामुळे ठाकरे आणि भाजपमध्ये झालेले मतभेद कधीही दूर होणार नाहीत. ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता नाही असे बावनकुळे म्हणाले. 


शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाची आजची सभा ही समारोपाची सभा आहे, असा टोला देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. वर्धापन दिनासाठी शिंदे गटालाच शुभेच्छा देणार असंही त्यांनी स्पष्ट केले. 
पंकजा मुंडे यांच्या रक्तारक्तात भाजप आहेत. त्या एखाद्या वेळेस घरी बसतील पण दुसऱ्या कुणाच्या सोबत जाणार नाहीत. पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास करुन वेगळा अर्थ काढला जातो अस म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी विषयी भाष्य केले.