भंडारा : जिल्ह्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यात जादूटोण्याचे प्रयोग होत असल्याचं उघड झाले आहे. जादुटोणा करताना युवक - युवतीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. राजनगावचा २६ वर्षीय आरोपी तांत्रिक जीतू अनिल मेश्राम याला आणि छत्तीसगडची २० वर्षीय युवती यांना पोलिसांनी अटक केली आहे. मैत्रिणीच्या मृत आईशी बोलणे करून देण्यासाठी म्हणून जीतू तांत्रिक पूजा करत होता. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच धाड टाकून दोघांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी अंधश्रद्धप्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंदवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका उच्च शिक्षित मुलीला तिच्या निधन झालेला आईला मुक्ती मिळवून देतो आणि तिच्याशी संवाद करवून देतो असे सांगून ३१ हजार रुपयांना गंडा घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. तसेच त्याच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. या प्रकरणात पीडित मुलीचा मैत्रिणीनेच हा डाव रचित हा प्रकार घडवून आणले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित मुलीची मैत्रीण आणि भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. 


भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे राहणाऱ्या अंकिता ( बदललेले नाव ) वय १९ हिने ट्युशन क्लासमध्ये मैत्री झालेल्या संगीता ( बदललेले नाव) हिला ब्लॅकमेल करीत तुझ्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसून तिला करणी करून मारण्यात आले आहे आणि तुझ्या भावालाही करणी करून मारण्यात येणार आहे. त्यामुळे तू सावध राहा. त्यासाठी तुला पूजा करून तुझ्या आईला मुक्ती देणे आवश्यक आहे, असे सांगून पूजा करण्यास तयार करण्यात आले. यासाठी छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे राहणारा जितू अनिल मेश्राम याच्या कडून पूजा करून आपल्या भावाचा आणि स्वतःचा जीव वाचव अशी बतावणी केली. जर तुला खोटे वाटत असेल तर बाबा तुझ्या आईशी बोलणे करून देण्यास सक्षम आहे, असेही सांगितले. पूजेसाठी पीडित  तरुणीस ३१,००० रुपयांची मागणी केली.


मात्र घडत असलेला प्रकार हा अनुचित असल्याची बाब पीडित तरुणीच्या लक्षात आली आणि तिने पवनी पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांचा लक्षात आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून उमरेड कराडला अभयारण्यात पूजा सुरु असताना धाड टाकली. यावेळी पीडित तरुणीची मैत्रीण आणि भोंदू बाबाला रंगेहात अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी अंधश्रद्धप्रतिबंधक कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.