सांगली : जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केलेत. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. हल्ला करणाऱ्या तरुणाने स्वतःचा गळा चिरला. त्याने हाताची नस कापून घेतली आहे. मुलगी आणि तरुण हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.


स्वतःवरही केले वार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कृष्णा पिसाळ (२५) हा मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. आज सकाळी त्याने मुलीवर हल्ला केला. त्याने मुलीवर ब्लेडने हल्ला केला. त्यानंतर त्याने काहीने स्वतःवर वार करुन घेतले सकाळची घटना दुपारी उघडकीस आली. जखमी कृष्णा पिसाळवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


बालकाची हत्या


दरम्यान, अमरावती येथे एकतर्फी प्रेमातून बालकाची हत्या केल्याची घटना समोर आलेय. नऊ वर्षीय निष्पाप बालकाचे अपहरण करून एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील दुनी येथे घडली. अधिक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.