डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, एक जखमी
डोंबिवली एमायडीसीतल्या एका कंपनीत सकाळी स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. सकाळी पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज २ मधल्या ऍल्युफिन कंपनीत हा स्फोट झाला.
डोंबिवली : डोंबिवली एमायडीसीतल्या एका कंपनीत सकाळी स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. सकाळी पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज २ मधल्या ऍल्युफिन कंपनीत हा स्फोट झाला.
कंपनीतल्या कम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात कामगार राजेंद्र जावळे गंभीर जखमी झाला. त्यांना एक पाय या स्फोटात गमवावा लागला. त्यांच्यावर एमआयडीसीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की कंपनीमधील एक मशीन 60 फूट लांब उडून कल्याण शीळ रस्त्यावर जाऊन पडली..डोंबिवली एमआयडीसीत मागच्या वर्षभरातली ही तिसरी स्फोटाची घटना आहे.