`प्रोबेस`नंतर डोंबिवलीत आणखी एका कंपनीत स्फोट
डोंबिवली एमआयडीसी भागातल्या हर्बर्ट ब्राऊन या कंपनीत छोटासा स्फोट झालाय.
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी भागातल्या हर्बर्ट ब्राऊन या कंपनीत छोटासा स्फोट झालाय.
परंतु, कंपनीतल्या सुरक्षा उपकरणांमुळे आग लगेच आटोक्यात आणली गेली. वर्षभरापूर्वी डोंबिवलीत झालेल्या 'प्रोबेस' कंपनीच्या शेजारीच ही कंपनी आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या कंपनीत 'प्रोबेस' कंपनीपेक्षाही घातक रसायनं होती. मात्र मोठा स्फोट झाला नाही. अनुचित प्रकारही घडला नाही.