परळी वैजनाथमध्ये साखर कारखान्यात स्फोट
परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं बारा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच कर्मचारी हे ९० टक्के भाजले असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीड : परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं बारा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच कर्मचारी हे ९० टक्के भाजले असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींवर आंबेजागाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पाचजणांना लातूरला हलवण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. यंदा गेल्या महिन्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाला.
दरम्यान, आज दुपारी ऊसाच्या रसाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. गरम रसामुळे वाफ साचल्यानं स्फोट झाल्याचा अंदाज आहे.