धुळ्यात रक्तदानाचा उपक्रम राबवत नव्या वर्षाचे स्वागत
नववर्षाचे स्वागत करण्यासह सरत्या वर्षाला निरोप देताना धुळे जिल्ह्यातील रक्ताश्रय या संस्थेने रक्तदानाचा उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केलंय.
धुळे : नववर्षाचे स्वागत करण्यासह सरत्या वर्षाला निरोप देताना धुळे जिल्ह्यातील रक्ताश्रय या संस्थेने रक्तदानाचा उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केलंय.
युवक बिरादरी आणि रक्ताश्रयचा उपक्रम
धुळे जिल्ह्यातील युवक बिरादरी आणि रक्ताश्रय ग्रुपतर्फे गेल्या ३३ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातोय. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठीक १२ वाजता रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा या संस्थांनी जोपासलीय. यावर्षी ही धुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्रीत येऊन मध्यरात्री रक्तदानाने नवीन वर्षाचे स्वागत केलं.
यावेळी माजी आमदार शरद पाटील यांच्यासह अनेक तरुणांनाही उत्स्फूर्तपणे रक्तदान करत नववर्षाचे स्वागत केलंय. १९८४ मध्ये रक्ताश्रय या संस्थेची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू रूग्णांना शेकडो बाटल्याचं रक्तदान करण्यात आलंय. गेल्या ३३ वर्षपासून अखंडपणे ही परंपरा सुरु आहे.